राज्यपाल मृदुला सिन्हा राष्ट्रपती, पंतप्रधानांना भेटल्या

0
82

गोव्याच्या राज्यपाल मुदुला सिन्हा यांनी काल दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दि. ३१ ऑगस्ट रोजी गोव्याच्या राज्यपाल म्हणून श्रीमती सिन्हा यांचा शपथविधी झाला होता. त्यानंतरची त्यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सिन्हा यांना घटनेची प्रत दिली. तर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना सांगितले की, राज्यपाल पद हे सक्रीय पद आहे. या पदाचा समाजकार्यासाठी चांगला वापर होऊ शकतो.