रेवोडा-मानस येथे काल दुपारी २.४० वा. च्या दरम्यान ट्रक व ऍक्टीव्हा स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात डॅनिलसन फर्नांडिस हा १६ वर्षीय युवक जागीच ठार झाला. तर सूरज लक्ष्मण मांद्रेकर हा १५ वर्षीय युवक जखमी झाला असून त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. हे दोघेही मानसीवाडा-रेवोडा येथील आहेत.
जीए ०३ के ०६८१ हा ट्रक कोलवाळहून नादोडाकडे जात होता तर जीए ०३ ए ८६७१ ही ऍक्टीव्हा स्कॅटर रेवोडाहून कोलवाळकडे जात असताना रेवोडा मानसीवाडा येथे पोहोचताच या दोन्ही वाहनात अपघात झाला. त्यात स्कूटर चालक डॅनिलसन फर्नांडिस हा जागीच ठार झाला तर सूरज मांद्रेकर हा जखमी झाला.
या अपघाताची माहिती म्हापसा पोलिसांना देताच पोलिस उपनिरीक्षक सदाशिव हन्सीकुट्टी व हवालदार किशोर नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ट्रक चालक धलेश अनंतराव प्रभूगांवकर (३७) विश्वासनगर लामगाव डिचोली याला अटक केली व पुढील तपास करीत आहेत.