पाकव्याप्त पूरग्रस्त काश्मीरसाठी भारताची मदतीची तयारी

0
94

जम्मू-काश्मीरमधील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठीही भारत तयार असल्याचे म्हटले आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरला गेलेल्या मोदी यांच्यासमवेत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहागहेही उपस्थित होते. काश्मीरी जनतेच्या मदतीसाठी अन्य राज्यांनीही हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले. पाकव्याप्त काश्मीरमधील पूरस्थिती संदर्भात पाक सरकारला मदत करण्यास भारताची तयारी असल्याचे मोदी यांनी सांगितले.