बाल विवाह बलात्कारापेक्षा वाईट : न्यायालयाचे मत

0
90

बाल विवाह बलात्कारापेक्षा वाईट असल्याचे भाष्य येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका खटल्याप्रकरणी केले आहे. बाल विवाहाचे देशातून उच्चाटन केले पाहिजे असे मतप्रदर्शनही या न्यायालयाने केले आहे. तसेच सरकारने हा गुन्हा करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय ही समस्या थांबणार नसल्याचेही म्हटले आहे. या विषयाच्या अनुषंगाने हुंडा प्रकरणाचा एक खटला वरील न्यायालयात चालू आहे. त्यातील मुलीचे १४व्या वर्षीच २०११ साली लग्न करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुलीच्या सासरच्या लोकांबरोबरच तिच्या आई वडिलांनाही फटकारले.