किंचित दिलासा देणार्या एका घटनेत काल पेट्रोलच्या दरात प्रती लिटर १ रुपया ८२ पैशांनी कपात करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी झाली आहे. याचबरोबर डिझेलच्या प्रती लिटर ५० पैशांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील पेट्रोलची ही तिसरी दर कपात आहे. १५ ऑगस्टआधी पेट्रोलच्या दरात प्रती लिटर १ रुपया ८९ पैशांनी कपात झाली होती.