दहशतवाद्यांबरोबरीत चकमकीत एक जवान शहीद

0
82

जम्मू-काश्मिरमधील नियंत्रण रेषेनजीक केरन येथे भारतीय सैनिक व दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीत जवान शहीद झाला. तसेच एक जवान जखमीही झाला. गेल्या २० दिवसांपासून नियंत्रण रेषेनजीक दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरु आहे. त्यात आतापर्यंत ६ दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच तीन जवानही शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर सातत्याने गोळीबार सुरू असताना पाकिस्तानसमर्थक दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचे डावपेच जाणून भारताने नियंत्रण रेषेसह आंतरराष्ट्रीय सीमेलगत पहारा वाढवला आहे.