अडवाणी, जोशी भाजपकडून वृध्दाश्रमात

0
180

कॉंग्रेसकडून संभावना
ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळावरून वगळून मार्गदर्शक मंडळात पाठवणी केल्याप्रकरणी कॉंग्रेसने भाजपच्या निर्णयावर उपहासात्मक टीका केली आहे. भाजपने अडवाणी व जोशी यांना वृध्दाश्रमात दाखल केले आहे अशा शब्दात कॉंग्रेसने भाजपच्या निर्णयाची संभावना केली आहे.
भाजपच्या वरील निर्णयामुळे अडवाणी व जोशी हे आता केवळ मूक दर्शक बनतील असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे सर्व सत्तेचे एका हातात केंद्रीकरणाची पूर्तता असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी केली आहे. भाजपचे मार्गदर्शक मंडळ म्हणजे मूकदर्शक मंडळ असेल अशी खिल्ली त्यांनी उडविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख न करता मनीष तिवारी यांनीही टीका केली. एका हातात सत्ता केंद्रित करण्याच्या प्रक्रियेला यामुळे अंतिम स्वरूप आले असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांनी मात्र हा भाजपचा अंतर्गत मामला असल्याचे म्हटले आहे.