शांतादुर्गा शिक्षण समितीतर्फे शिक्षण परिषदेचे आयोजन

0
122

शांतादुर्गा शिक्षण समिती, कवळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण आणि समाज या विषयावर १३ व १४ सप्टेंबर रोजी कला अकादमी, पणजी येथे महत्वपूर्ण शिक्षण परिषद भरविण्यात येणार असून उद्घाटन सत्रात ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर समारोप सत्रात विख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे असतील व त्यांची प्रमुख भाषणे होणार आहेत.
शुक्रवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष कुमार सरज्योतीषी, सल्लागार शिक्षणतज्ज्ञ डॉ. नारायण देसाई यांनी परिषदेमागील उद्देश व त्याचे महत्व याविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेचे संयुक्त सचिव मनोज भांडणकर व कोषाध्यक्ष गुरुनाथ टेग्से उपस्थित होते. ही परिषद सहा सत्रात विभागण्यात आली आहे. पहिल्या सत्राचा विषय शिक्षणात कौशल्य विकास हा असेल. शिक्षणाच्या प्रसाराने कुशल मनुष्यबळाची मागणी कामाच्या जगात पूर्ण झालेली नाही. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिलने कौशल्य विकासासाठी मोठे लक्ष्य ठेवले आहे व त्यासाठी अपेक्षित निकालासाठी योग्य व्यूहरचना करावी लागेल याची जाणीव डॉ. देसाई यांनी दिली. ते म्हणाले, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे हे शिक्षणाचे प्राथमिक प्रयोजन असले तरी, शिक्षण संस्था समाज जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावीत असल्याने व राष्ट्रीय उभारणीत योगदान देत असल्याने उज्ज्वल भविष्यासाठी सशक्त समाज घडविण्याचे कार्य शिरावर घेण्याची जबाबदारी या संस्थांची आहे. शाळांच्या विकासात आदर्श आणि नव कल्पना (आयडीयल्स ऍण्ड आयडीयान) या संदर्भात दुसर्‍या सत्रात सखोल चर्चा होईल.
शिक्षण अर्थपूर्ण आणि विद्यार्थी व समाजासाठी वरदान ठरले तर तो सशक्ती करणाचा उपक्रम होईल. सुशिक्षित नागरिकांनी समाजोध्दारासाठी योगदान द्यावे असे वाटत असेल तर निर्णय क्षमता पक्की व्हायला हवी. त्यादृष्टीने उहापोह करण्यात येईल.
तपशीलवार कार्यक्रम
१३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ९.३० पर्यंत नावनोंदणी, सकाळी ९.३० ते ११ पर्यंत उद्घाटन, ११.३० ते दुपारी १ पर्यंत ङ्गस्कील डिव्हलपमेंट इन एज्युकेशन ए परस्पेकटीव्हफ या विषयावर परिसंवाद होईल. यात चेन्नई येथील युवराज गलादा (पॉलिसी परस्पेक्टीव्ह) व जोज मानुएल नोरोन्हा (फक्शनल आस्पेक्ट) हे विचार मांडतील. दुपारी २.१५ ते ३.४५ पर्यंत ङ्गएज्युकेशन फॉर कम्युनिटी बिल्डिंगफ या विषयावर व्हल्ली स्कूल बेंगलोरचे डॉ. सतीश इनामदार व विवेकानंद केंद्र, बेंगलोरचे विश्‍वास लापलकर विचार मांडतील.
सायंकाळी ५.४५ वाजता ङ्गइलेमेंटरी एज्युकेशन ऍण्ड टिचिंग ऑफ सायन्स ऍण्ड मॅथेमॅटीक्सफ या विषयावर पुणे येथील जनप्रबोधिनीचे विवेक पोंक्षे मार्गदर्शन करतील. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. ङ्गयुज ऑफ टेक्नॉलॉजी इन स्कूल एज्युकेशनफ यावर एम्‌केसीएल, पुणेचे विवेक सावंत व गोवा विद्यापीठातील रामराव वाघ उहापोह करतील. सकाळी ११.३० वा. ङ्गएज्युकेशन फॉर एंटर प्रॅनुअरशिपफ या विषयावर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व ज्ञानप्रबोधिनी पुणेचे आदित्य शिंदे मार्गदर्शन करतील. दुपारी २.१५ वाजता ङ्गक्लालिटी ऍश्युरन्स इन स्कूल एज्युकेशनफ या विषयावर एन्‌एबीटी, दिल्लीचे ए. एस्. चंद्रशेखर व अनिल खेर (गोवा) विवेचन करतील. ४.१५ वा. समारोप सत्र होईल.