लोकसभा विरोधी नेत्याची व्याख्या सुप्रीम कोर्ट ठरवणार

0
91

लोकसभा विरोधी नेतेपदाचा प्रश्‍न मिटविण्यास सरकार अपयशी ठरल्याने आता विरोधी नेतेपदाची व्याख्या करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. लोकसभा सभापतींनी कॉंग्रेसला अधिकृत विरोधीनेतेपद देण्यास नकार दिल्यानंतर मुख्य न्या. आर. एम. लोढा, न्या. कुरियन जोसेफ, न्या. रोहिंग्टन नरीमन यांनी चिंता व्यक्त करताना विरोधी नेतेपद महत्त्वाचे असल्याचे सांगितले. लोकपाल, मानव अधिकार आयुक्त, दक्षता आयुक्त यांच्या निवडीत लोकसभा विरोधी नेत्याची भूमिका असल्यामुळे पदाची व्याख्या करण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दर्शवली. अधिकृत विरोधी नेतेपदासाठी लोकसभेत दहा टक्के जागा हव्या असतात. कॉंग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्याने त्यांना पद मिळणार नसल्याचे सभापती सुमित्रा महाजन यांनी म्हटले होते.