बिहारच्या पूर्व चंपारण भागात सेमरा आणि सुगावली स्थानकादरम्यान, एका क्रॉसिंगवर वेगवान रेल्वेची रिक्षाला धडक बसून २० जण ठार झाले. मृतांत आठ मुलांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच परिवारातील होते. टक्कर इतकी जबरदस्त होती की रीक्षा हवेत उसळली गेली. दरम्यान, काल दिल्लीत फुटपाथवर झोपलेल्या १३ जणांच्या अंगावरून एकाने कार नेल्याने ते जखमी झाले. पैकी एकाचा मृत्यू झाला.