वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणलेल्या दोन मुलींची पर्वरी पोलिसांनी दबा धरून सुटका केली. त्या मुलीना आणलेल्या मूळ आरोपी महिलेस पोलिसांनी कळंगुट येथून ताब्यात घेतले आहे.
मुंबईस्थित नेहा ऊर्ङ्ग ङ्गरझाना सिद्दिकी (३०) या महिलेने दि. २ रोजी दोन मुलींना व्यवसायासाठी गोव्यात आणले होते.
कळंगुट येथून सदर महिला व्यवसाय चालवीत होती. दि. ५ रोजी पर्वरी पोलिसाना खबर्यांकडून पर्वरीत मुलींना पुरविण्यासाठी आणण्यात येणार असल्याची खबर मिळताच वाळांत येथील हॉलीडे व्हिलेज येथे पोलीस दबा धरून बसले. सायंकाळी ५.१५ वाजता दोन तरुणी ऑटो रिक्षामधून उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करताच सदर नेहा हिने आपणास वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. त्याच रात्री कळंगुट येथून नेही हिस पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने आपला गुन्हा कबुल केला असून म्हापसा येथील न्यायदंडाधिकार्यांसमोर तिला हजर केले असता चार दिवसांचा रिमांड मिळाला आहे.
अपघातातील जखमी तरुणीचे निधन
पेरवाडा-न्हावेली साखळी येथे ३ मार्च रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भुवनेश्वरी आईर (२३) या तरुणीचे काल दि. ६ रोजी बांबोळी येथे उपचारादम्यान निधन झाले. डितोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघात स्विफ्ट डिझायर कार व इनोव्हा कार यांच्यात झाला होता. यावेळी स्विफ्टमध्ये चालक संदेश मोरजकर, पीटर डिलिमा, कामाक्षी आयर व भुवनेश्वरी हे इसम होते. तर इनोव्हा मिलिंद चोडणकर हा चालवत होता. हवालदार हरिश्चंद्र परब यांनी पंचनामा केला. पुढील तपास उपनिरीक्षक विष्णू कोरगावकर करत आहेत.