Home बातम्या एसीजीएल कंपनीत कामगारांना विषबाधा

एसीजीएल कंपनीत कामगारांना विषबाधा

0
होंडा-सत्तरी येथील एसीजीएल कंपनीत भाजीपावात पाल पडल्याने कामगारांना विषबाधा झाली. या प्रकारानंतर २५ जणांना साखळी सरकारी इस्पितळात दाखल करावे लागले.

काल सकाळी कँटीन चालविणार्‍या कंत्राटदाराने कामगारांना भाजीपावाचा पुरवठा केला. सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर १५ कामगारांना उलट्या सुरू झाल्या. दोघांना जास्त त्रास झाला. त्या सर्वांना साखळी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आल्यामुळे भाजी तपासून पाहिली असता त्या भाजीत पाल असल्याचे आढळून आले. काही वेळाने आणखी दहाजणांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यांनाही साखळी हॉस्पिटलात नेण्यात आले. साखळी इस्पितळाचे डॉ. कुणाल यांनी माहिती देताना सांगितले की, त्यातील पंधरा जणांना अन्नातून विषबाधा झाली असून दोघांना जास्त प्रमाणात झाली होती. इतर दहा जणांना पाल पाहून उलट्या सुरू झाल्या. त्या सर्वांना उपचार करून दुपारी जाऊ दिले.