Home बातम्या पंतप्रधानपदासाठी कोण सर्वोत्तम हे देवच ठरवील

पंतप्रधानपदासाठी कोण सर्वोत्तम हे देवच ठरवील

0
सलमान आपल्या ‘जय हो’ चित्रपटाच्या अनुषंगाने येथे आला आहे, तसेच पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी तो भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत होता. देशाचा पंतप्रधान होण्यास कोण योग्य व्यक्ती आहे असा प्रश्‍न त्याला पत्रकारांनी विचारला होता. देशातील सर्वोत्तम व्यक्ती भारताचा पंतप्रधान व्हावा. अशीच व्यक्ती निवडून येवो असे तो म्हणाला. त्याचवेळी ‘आपले दैव घडविण्यात मोदी साहेब यशस्वी होऊ शकतात’ असेही त्याने सांगितले.

सलमानने मोदी यांची प्रशंसाही केली. मात्र मोदी पंतप्रधान व्हावे असे तो म्हणाला नाही. मोदी राजकारणातील एक चांगली व्यक्ती आहे. ‘मला ते आवडतात. कारण ते देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी काम करू शकतात’ याकडे त्याने लक्ष वेधले. आपल्या मुंबईतील मतदारसंघात प्रिया दत्त (खासदार) व बाबा सिद्दिकी (आमदार) या उत्तम व्यक्ती आहेत असे सांगून ‘जर तुम्हाला मोदी सर्वोत्तम वाटतात, तर तुम्ही त्यांना मत द्या’ असे आवाहन त्याने केले. मोदींविषयी वैयक्तिक मत विचारले असत सलमान म्हणाला, ‘आज मी मोदीजींना पहिल्यांदाच भेटलो. आशा आहे की आम्ही यापुढेही भेटू. मोदी महान आहेत आणि ते त्यांच्या राज्यासाठी मोठे कार्य बजावीत आहेत. त्यांच्या जीवनात मी त्यांना सर्वतोपरी शुभेच्छा देतो’ त्यानी केला तसा विकास मी अन्य कोठे पाहिला नाही.