Home बातम्या आणखी चार मृतदेह सापडले

आणखी चार मृतदेह सापडले

0
 ११ रोजी आढळलेल्या चारही मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे रामनाथ गोस्वामी, दिनेश गोस्वामी, गोपाल गोस्वामी आणि लक्ष्मण बक्षीस अशी असून चारही मजूर झारखंडचे आहेत. ज्या गतीने हे काम चालू आहे त्याकडे पाहता अजून दोन दिवस तरी ढिगारा खाली करायला लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कॉंग्रेस युवा मोर्चाचा आज मेणबत्ती मोर्चा

पणजी (न. प्र.) : काणकोण इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी युवा कॉंग्रेसतर्फे आज संध्याकाळी ५.३० वा. काणकोणात मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे युवा कॉंग्रेस अध्यक्ष वालंका आलेमांव यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काणकोणात एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना भाजपवाले राज्यात नरेंद्र मोदींची सभा कशी घेऊ शकतात, असा सवाल वालंका यांनी यावेळी केला.

सात दिवस मेणबत्ती मोर्चा

चावडीवरील नागरिकांनी मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सतत तिसर्‍या दिवशी मेणबतत्ती मोर्चा काढला. हा मोर्चा सात दिवसपर्यंत चालू असेल असे माजी नगरसेवक स्टँनली ग्रासियस यांनी सांगितले.
दरम्यान, काणकोण तालुक्यात १० रोजी भर दुपारी झालेल्या घरफोडीच्या पार्श्‍वभूमीवर काणकोणच्या पोलिसांनी संपूर्ण तालुक्यातील गस्त वाढविली आहे.