Home बातम्या ‘रेनी डे’ ३१ रोजीपासून गोवा- महाराष्ट्रात प्रदर्शित करणार

‘रेनी डे’ ३१ रोजीपासून गोवा- महाराष्ट्रात प्रदर्शित करणार

0
‘ए रेडी डे’ या चित्रपटातून भ्रष्टाचार हा सध्याचा ज्वलंत विषय हाताळण्यात आला असल्याचे ते म्हणाले. लोकपालसारखा कायदा करून अथवा नवे पक्ष स्थापन करून भ्रष्टाचार नाहीसा होणार नाही. प्रत्येक घरातून जेव्हा भ्रष्टाचार बंद होईल तेव्हाच तो नाहीसा होणार असल्याचे ते म्हणाले.ऑस्कर पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर रसुल पुट्टुकी यांनी चित्रपटाचे साऊंड डिझायनिंग केलेले असून या चित्रपटाला पार्श्‍वसंगीत नाही हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अजिंक्य देव व सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय हर्ष छाया, न पेंडसे, मनोज जोशी, मीनाक्षी मार्टिन्स, प्रिन्स जाकोब, शैला कामत, समीक्षा देसाई, दक्षा शिरोडकर आदींच्याही त्यात भूमिका आहेत.
 संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात करण्यात आलेले असून चित्रपटाचे कोकणीतूनही डबिंग करण्यात आलेले आहे. गोव्यात कोकणी व मराठी अशा दोन्ही भाषांतून चित्रपट दाखवण्यात येणार आहे. शिवाय महाराष्ट्रातही (मुंबई) मराठी बरोबरच कोकणीतून डब केलेल्या ‘ए रेनी डे’चे खेल दाखवण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला मीनाक्षी मार्टिन्स, समीक्षा देसाई, दक्षा शिरोडकर, प्रिन्स जाकोब व शैला कामत हजर होती. या कालाकारांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.