Home बातम्या महामार्गावर उतरवले विमान

महामार्गावर उतरवले विमान

0
एक खासगी चार आसनी विमान अचानक मध्य प्रदेशच्या महामार्गावर उतरवल्याने एकच गोंधळ उडाला. खराब हवामानामुळे हे विमान अचानक उतरवावे लागले.  अनिवासी भारतीय सॅम वर्मा यांचे हे खासगी पायपर पीए – ३० विमान सराव भ्रमंतीवर असताना अचानक खराब हवामानात सापडल्याने चौपदरी महामार्गावर उतरवावे लागले.

यावेळी पायलट एकटाच विमानात होता. त्याने धरण परिसरात विमान उतरवण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली. त्यानंतर महामार्गावर विमान उतरवले गेले. सुरक्षित लँडिंगसाठी दोन्ही बाजूने वाहतूक रोखून धरण्यात आली होती. पायलटला कोणतीही इजा झाली नाही.
दरम्यान, विमान उतरवण्याची परवानगी कोणी दिली याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी विमान वाहतूक खाते व वाहतूक खात्याकडून अहवाल मागविला आहे.