Home बातम्या नायजेरियन्सच्या रितसर चौकशीची मागणी करणार – आमदार लोबो

नायजेरियन्सच्या रितसर चौकशीची मागणी करणार – आमदार लोबो

0
 कोल्हापूर, बेळगांव, मुंबई आदी ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेले कित्येक नायजेरिएन कायम गोव्यात वास्तव करून असतात. केवळ नावासाठी त्यानी महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असतो. कित्येकांकडे व्हिसा व पासपोर्ट नसल्याचे यापूर्वीच पोलिसांना आढळून आलेले असून त्यांची त्यांच्या देशात परतपाठवणी केली जावी अशी मागणी आपण गृहमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.

नायजेरिएन्सची दादागिरी चालूच असून भीतीपोटी कुणीही तक्रार दाखल करण्यास पुढे येत नसल्याचे लोबो यांनी सांगितले. हडफडे व पर्रा येथे येथील दोघा युवतींनी छेडछाड प्रकरणी त्यांच्याविरुध्द पोलीस तक्रार करण्याचे धाडस केले होते. इतरांनीही पुढे येऊन तक्रारी नोंद कराव्यात, असे लोबो म्हणाले.