चारा घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा झालेल्या लालू प्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. गेल्या दोन महिन्यांपासून लालू कारागृहात होते.
अशा इतर प्रकरणांत आरोपींना जामीन दिले गेल्याचा मुद्दा लक्षात घेऊन सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, जामीनासाठीच्या शर्ती खटला चाललेल्या कनिष्ट न्यायालयानेच ठरवाव्यात असे निर्देश कोर्टाने दिले. दरम्यान, सीबीआयनेही प्रसाद यांच्या जामिनास विरोध दर्शवला नाही. लालूंच्यावतीने राज जेठमलानी यांनी बाजू मांडली.
झारखंड हायकोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर प्रसाद यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
बनवेगिरी करून सरकारी तिजोरीतून रु.३७.७ कोटी उकळल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव व ४३ अन्य जणांना ३० सप्टेंबर रोजी विशेष सीबीआय कोर्टान दोषी ठरवले होते.