धारगळ टोलबूथ दंगा प्रकरण
धारगळ टोल बूथ दंगा प्रकरणातील नितेश राणे वगळून अन्य तीन संशयितांना ओळख परेडसाठी पेडणे पोलीस स्टेशनवर आणले जाणार असल्याची माहिती या स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.
गेल्या ३ रोजीच्या वरील घटनेवेळी संशयितांनी वापरलेल्या गाड्या (क्र. एमएच ०२ डीजी २३ सफरी, एमएच ०७ क्यू ४८३७ मारूती व्हॅगनर व एमएच एआर ३२४१ टाटासुमो) पेडणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. वाहनांसाठी न्यायालयात अर्ज सदर तिन्ही वाहने परत मिळावी यासाठी वाहनचालकांनी न्यायालयात अर्ज केला असून त्यावर अजून निर्णय झालेला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याला पेडणे पोलिसांनी पत्र लिहून काय काय नुकसानी व इतर माहिती मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी पेडणे पोलिस स्टेशनवर तिसर्या दिवशी हजेरी लावल्याने ४ संशयितांची हजेरी ६ रोजी संपली असून उर्वरीत ५ जणांना ७ रोजी पर्यंत हजेरी लावायची आहे.
हसत फोटो घ्या : राणे
दुपारी १ वाजता पोलिस स्टेशनमधून नितेश राणे बाहेर आले त्यावेळी स्थानिक पत्रकारांशी हस्तांदोलन करून आमचे फोटो हसत घ्या, असे म्हणाले.