वरील घटनेनंतर तेजपाल यांनी वेगवेगळ्या लोकांना पाठविलेले इमेल, एसएमएस यांचीही चौकशी केली. विशेष म्हणजे तेजपाल यांच्यावरील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे सांगितले जात असले तरी या आरोपांविषयी विचारले असता त्याबाबत आपल्याला आठवत नसल्याचे तेजपाल यांनी पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे पोलिसांनी त्यांना बांबोळी येथील मानसोपचार इस्पितळात नेऊनही तपासणी केली.
पोलीस कोठडीत पंखा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या मागणीचा अर्ज न्यायालयात असून आज त्यावर सुनावणी होईल.