Home बातम्या ‘तालिबानशी शांतीवार्ता अमेरिकेला नको’

‘तालिबानशी शांतीवार्ता अमेरिकेला नको’

0

पाकिस्तानच्या वझीरीस्तान भागात झालेल्या अमेरिकेच्या ड्रोण हल्ल्यात पाकिस्तानचा तालिबान प्रमुख हकीमुल्ला मेहसूद ठार परवा ठार झाल्यानंतर काल खान सयद मेहसूद ऊर्फ सजना यांची नवे तालिबान प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.

दरम्यान, अमेरिकेकडून वाढत्या ड्रोण हल्ल्यांबाबत पाकिस्तानने गंभीर चिंता व्यक्त केली. पाकिस्तान सरकारची तालिबान्यांशी चर्चा बंद व्हावी या उद्देशाने हे हल्ले जाणूनबुजून करण्यात येत असल्याचे पाकिस्तानने म्हटले. दुसरीकडे तालिबान्यांच्या काऊंसिलने ड्रोण हल्ल्यांचा सूड घेणार असल्याचे जाहीर केले आहे.