धर्मापूर येथील सांमिगेल वाड्यावर काल वनखात्याने पिंजरा लावून बिबट्या वाघाला पकडले. कित्येक दिवसांपासून तो कोंबड्या, गुरांना खात असे. तेथील लोकांनी तक्रार करताच वनखात्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून ठेवला. त्यात भक्ष्य खाण्यासाठी गेला असता, आत सापडला. वन खात्याच्या अधिकार्यांनी त्याला नेत्रावळी येथील अभयारण्यात पाठविला आहे. तो सात वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले.