काल झालेल्या गोवा विद्यापीठ मंडळाच्या निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करून निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेले एनएसयुआयचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी निदर्शने करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांच्या कॅबिन’ध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली.
या निवडणुकीत अ. भा. विद्यार्थी परिषदेचा गट निवडून आला आहे. अटक केलेल्या युवकांना पोलिसांनी अटक करून आगशी पोलीस स्थानकावर नेवून ठेवले. त्यानंतर सोपस्कार पूर्ण करून त्यांना मुक्त केले. कुलगुरुनी आपल्या जवळ चर्चा करण्यासाठी फक्त दोघांनाच येण्यास मान्यता दिली होती. परंतु एनएसयुआयला ते मान्य नव्हते. निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप होता.