51 पोलिसांचा होणार सन्मान

0
19

राज्यातील पोलीस खात्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिसांचा पोलीस महासंचालक उल्लेखनीय कार्य पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य पोलीस स्थापना दिनी पोलीस दलातील 51 पोलीस कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या 51 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे, पोलीस निरीक्षक हिरू कवळेकर, कृष्णराव प्रभुदेसाई, निखिल पालेकर, राहुल परब, विरेंद्र वेळुस्कर यांच्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक उपनिरीक्षक, महिला पोलीस उपनिरीक्षक, हवालदार आणि पोलीस शिपायांचा समावेश आहे.