4 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी

0
17

राज्य सरकारने राज्य नागरी सेवेतील वरिष्ठ 4 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काल जारी केला. मेल्विन वाझ यांची गोवा पुनर्वसन मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोपाळ पार्सेकर यांची डीआरडीए (उत्तर) प्रकल्प संचालक, वासुदेव शेट्ये यांची एसएलएओ-मोपा विमानतळ, डॉ. अजय गावडे यांची सीईओ-उत्तर गोवा जिल्हा पंचायत आणि व्यवस्थापकीय संचालक गोवा हस्तकला महामंडळ या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.