संत श्री साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचे काल रात्री पणजीतील श्रीमहालक्ष्मी मंदिराबाहेर आगमन झाले त्यावेळी शेकडो भाविकांनी त्यांचे असे उत्स्फूर्त स्वागत केले. श्रीसाईंच्या पादुका आज दि. १३ व उद्या दि. १४ रोजी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर लोकांना दर्शनासाठी ठेवण्यात येतील.