0
7

लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेला काल भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत श्रींचे दर्शन घेतले. होमकुंड आणि त्यातून साकारले जाणारे अग्निदिव्य हे या जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य असून, मंदिरालगत साकारलेल्या होमकुंडामध्ये लाकूड अर्पण करून भाविकांनी काल प्रदक्षिणा घातल्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हे अग्निदिव्य पार पडेल.