0
431

इस्त्रोने काल श्रीहरीकोटा येथून २२३० किलो वजनाच्या दक्षिण आशिया उपग्रहाचे (जीसॅट-९) ‘नॉटी बॉय’ या रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रकल्पाची किंमत सुमारे ४५० कोटी रुपये आहे. दक्षिण आशियासाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तान वगळता भारतासह नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव व अफगाणिस्तान या राष्ट्रांना या उपग्रहाचा फायदा होणार आहे.