30 लाखांचे बक्षीस असलेल्या
नक्षलवाद्यास नेपाळमध्ये अटक

0
4

माओवादी संघटना पीएलएफआयचा प्रमुख दिनेश गोपे याला अटक करण्यात आली आहे. त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली. एनआयए व झारखंड पोलिसांनी ही संयुक्त कारवाईकेली. झारखंड पोलिसांनी दिनेश गोपवर 25 लाखांचे तर राष्ट्रीय तपास संस्थेनेही (एनआयए) त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. आता त्याला नेपाळमधून दिल्लीत आणले जात आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्याला दिल्लीहून रांचीला हलवण्यात येणार आहे.

शीख वेशात वस्ती
दिल्लीच्या एनआयए स्पेशल टीम व झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे शनिवारी सायंकाळी दिनेश गोपला अटक केली. दिनेश नेपाळमध्ये शीखांच्या वेशात राहत होता. त्याच्यावर 2 डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात कंत्राटदार व व्यावसायिकांना धमकावून खंडणी वसूल करणे व साथीदारांमार्फत खंडणीची रक्कम गुंतवण्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

दोन पत्नींनाही अटक
30 जानेवारी 2022 रोजी, एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करत दिनेश गोपच्या हीरा देवी व शकुंतला कुमारी या 2 बायकांना अटक केली होती. या दोघींवर शेल कंपन्यांमध्ये लेव्ही-एक्सटॉर्शनचे पैसे गुंतवल्याचा आरोप होता. चौकशीत त्याची पुष्टीही झाली आहे. यापूर्वी 10 नोव्हेंबर 2016 पोलिसांनी रांचीतून दिनेश गोपची 25 लाख 38 हजार रुपयांची रक्कम जप्त केली होती.