राज्य सरकारने एका आदेशाद्वारे आयएएस अधिकारी प्रसन्न आचार्य यांची मत्स्यव्यवसाय, दिव्यांग सक्षमीकरण, प्रोव्हेदोरिया आणि पशुसंवर्धन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. आयएएस अधिकारी सरप्रीत सिंग गिल यांची जलसंपदा, समाज कल्याण, नियोजन आणि सांख्यिकी सचिव आणि उत्पादन शुल्क आणि राज्य कर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच राज्य सरकारने अन्य एका आदेशाद्वारे जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंतापदाचा अतिरिक्त ताबा अतिरिक्त मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना सेवानिवृत्तीनंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळी सरकारने प्रमोद बदामी यांना सेवावाढ दिलेली नाही.