28 पोलीस उपअधीक्षकांची थेट भरती रद्द

0
6

गोवा लोकसेवा आयोगाने पोलीस खात्यातील 28 पोलीस उपअधीक्षकांची थेट भरतीची प्रक्रिया अखेर रद्दबातल केली आहे. लोकसेवा आयोगाने पोलीस खात्यातील 28 पोलीस उपअधीक्षकांच्या भरतीची प्रक्रिया मागील वर्षी 2023 मध्ये सुरू केली होती. या भरती प्रक्रियेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. पोलीस खात्यात थेट उपअधीक्षक भरती नियमामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारतर्फे न्यायालयात देण्यात आली होती. राज्य सरकारने गोवा लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता, लोकसेवा आयोगाने थेट भरतीची प्रक्रिया रद्दबातल केल्याचे जाहीर केले आहे.