धनगर आरक्षणाच्या याचिका फेटाळल्या

0
9

>> मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; ‘धनगड’ आणि ‘धनगर’ वेगवेगळे

महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला होता; परंतु महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने काल फेटाळल्या. याशिवाय ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच नाहीत, असे निरीक्षणही नोंदवले.

सन 1950च्या राष्ट्रपती आदेशाअन्वये अनुसूचित जमातीच्या (एसटी) प्रवर्गात ‘धनगड’ अशी जात समाविष्ट करण्यात आली; परंतु महाराष्ट्रात ‘धनगड’ अशी जमातच नाही, तर ‘धनगर’ जमात आहे. राज्यात शासन दरबारी टंकलेखनाच्या चुकीमुळे ‘धनगड’च्या ऐवजी ‘धनगर’ अशी नोंद झाली आणि त्यामुळे राज्यातील धनगर समाज हा एसटी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिला. त्यामुळे ‘धनगड’च्या जागी ‘धनगर’ अशी नोंद करण्याचे आदेश केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाला द्यावेत, अशी विनंती अनेक याचिकांद्वारे करण्यात आली होती; मात्र अंतिम सुनावणीअंती काल न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या.