0
161

दाबोळी येथील अपघातात दुचाकीचालक जागीच ठार
सांकवाळहून वास्कोच्या दिशेने दुचाकीवरून येत असतेवेळी २७ वर्षीय प्रमोद कांबळी यांचा दाबोळी महमार्गावर गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला. दुचाकीवरील स्वार बिकास राय हा युवक सुदैवाने किरकोळ जखमी होऊन बचावला. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी १.३५ च्या सुमारास सदर अपघात घडला. बिर्ला जुवारीनगर येथे राहणारा प्रमोद त्याचा मित्र बिकाससह जीए- ०६- क्यू- ०८२४ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून वास्कोच्या दिशेन येत होता. प्रमोद दाबोळी येथील एन. एस. डी. गेटच्या समोरील महामार्गावर पोचला असता त्याचा अचानक दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीने दुभाजकला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रमोदचे डोके जोराने दुभाजकाला आपटल्याने अतिरक्तस्रावामुळे तो जागीच ठार झाला. वास्को पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मयत प्रमोदचा मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियो शवागृहात पाठवून दिला आहे. प्रमोद हा मूळ महराष्ट्र येथील असून बिकास हा झारखंड येथील रहिवासी आहे. सदर दोन्ही मित्र गेल्या काही काळापासून बिर्ला झुवारीनगर येथे राहत आहेत.