‘2024 मध्येही भाजपचे देशात बहुमताचे सरकार’

0
10

राजकीय विषयांवरही स्पष्टपणे भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये पूर्वीपेक्षाही अधिक जागांसह सरकार येईल, असे गडकरी यांनी सांगितले. आम्हाला लोकसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षाही अधिक जागा मिळतील. आम्ही देशाचे भविष्य सुधारले असून, जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला पुन्हा एकदा विजयी करणार आहे, असे गडकरी म्हणाले.