Home बातम्या 200 टक्के आयातशुल्काच्या धमकीनंतरमोदी – शरीफ यांची युद्धबंदीस सहमती

200 टक्के आयातशुल्काच्या धमकीनंतरमोदी – शरीफ यांची युद्धबंदीस सहमती

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या दाव्याने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध रोखल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांना अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना फोन करून आपण 200 टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिली होती. यानंतरच दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यास सहमती दर्शविली, असा नवा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी ‘बोर्ड ऑफ पीस’च्या बैठकीत ते बोलत होते.
पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले की आपण भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले.

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मी दोघांनाही फोन केला. मी त्यांना (शहबाज शरीफ) चांगले ओळखत नव्हतो; पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगले ओळखतो. मी फोन केला आणि म्हणालो, ‘मी डील करणार नाही. जर तुम्ही लोक लढत राहिलात आणि हे युद्ध थांबवले नाही, तर मी 200 टक्के आयातशुल्क लावेन, अशी धमकी दिल्याचे डोनाल्ड
ट्रम्प म्हणाले.