राज्यातील गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यावर्षी एकूण 19,573 विद्यार्थी बसणार आहेत. गतवर्षी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला 20,476 विद्यार्थी बसले होते.
दहावीची परीक्षा 1 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्यभरातील 31 परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेला दररोज सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या 45 मिनिटे अगोदर केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
यावर्षी एप्रिलमधील दहावीच्या परीक्षेला एकूण 19573 उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. त्यात 9757 मुलगे आणि 9816 मुली यांचा समावेश आहे. तसेच 258 अनुत्तीर्ण/सुधारणा आणि 363 खाजगी/आयटीआय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आसन व्यवस्थेबाबत माहिती उपलब्ध आहे.