17 लाखांचा गांजा पणजी येथे जप्त

0
18

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने पाटो पणजी येथील नवीन बसस्थानकाजवळ छापा घालून दोन व्यक्तींना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे 17 लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त केला. या प्रकरणी रविराज रिवणकर (26, रा. वेर्णा) आणि लिंगू दोनर (35, रा. मडगाव) या दोघांना संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांच्याकडे 170 ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा आढळून आला. या प्रकरणामध्ये एक स्कोडा कारगाडी जप्त करण्यात आली आहे.