12 नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत खात्मा

0
10

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले.
सविस्तर माहितीनुसार, छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील गडचिरोलीच्या वंडोली गावातील जंगलामध्ये 15 नक्षलवादी लपून बसल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सहा तास चाललेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान जखमी झाला. त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला नेण्यात आले आहे.