11 पुरातन वारसा स्थळांवर 50 रुपये प्रवेश शुल्क लागू

0
1

राज्यातील 11 पुरातन वारसा स्थळे पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आकारला जाणार आहे. राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. ह्या 11 वारसा स्थळांवर आता 50 रुपये एवढे प्रवेश शुल्क पर्यटकांकडून आकारले जाणार आहे, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली. प्रवेश शुल्कातून मिळालेल्या निधीचा वापर वारसा स्थळ देखभालीसाठी केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील बार्देशमधील शापोरा किल्ला, पेडणेमधील हळर्ण किल्ला, काणकोण येथील काब द राम किल्ला, सांत इस्तेव, मुरगाव, सिकेरी आणि खोर्जुवेचा किल्ला, जुवे गोवेतील अवर लेडी ऑफ माँटेचे चॅपल, खांडेपार येथील गुहा, पणसामळ रिवण येथील खडकावर कोरीव काम (रॉक कार्विंग) आणि नार्वे-दिवाडी येथील सप्तकोटेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आकारला जाणार आहे, असे अधिसूचनेत
म्हटले आहे.