९९ देशांच्या प्रवाशांना क्वारंटाईनशिवाय प्रवेश

0
34

अमेरिका, यूएई, कतार, फ्रान्स आणि जर्मनीसह ९९ देशांतील प्रवाशांना देशात मुक्त प्रवेश करण्याची परवानगी भारताने दिली. त्यांना क्वारंटाईनशिवाय भारतात प्रवेश मिळेल.
या ९९ देशांतून येणार्‍यांना त्यांचे संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावे लागेल. शिवाय भारताकडे प्रस्थान करण्याच्या ७२ तासांच्या आतील करोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्टही अपलोड करावा लागेल. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनशिवाय भारतात प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, काही देश सध्या भारताच्या कोविडच्या दृष्टिकोनातून धोकादायक यादीत आहेत. या देशांव्यतिरिक्त इतर देशांतील प्रवाशांना भारतात आल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी असेल आणि १४ दिवसांसाठी ते स्वतः आरोग्याची देखरेख करतील. त्यांना क्वारंटाईन राहावे लागणार नाही.