८ जणांविरुद्ध लूक आऊट नोटीस

0
10

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने ८ जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी सीबीआयने सिसोदिया यांच्यासह १४ जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे; मात्र सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सदर नोटीस बजावली का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सीबीआयने विजय नायर, अमनदीप धल, समीर महेंद्रू, अमित अरोरा, सनी मारवा, अरुण पिल्लई, अर्जुन पांडे आणि दिनेश अरोरा यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे.