हवामान विभागाने राज्यात येत्या ६ जूनपर्यंत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. पश्चिम किनारपट्टी आणि कर्नाटकात मोसमी पावसाची आगेकूच झालेली नाही, अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यात राजधानी पणजीसह साखळी, सत्तरी, बांबोळी, मंडूर आणि इतर काही भागात गडगडाटासह काल पावसाने हजेरी लावली. सध्या राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याची हवामान विभागाने दिली.