६१ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानकडून अटक

0
91

पाकिस्तानी सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानी अधिकार्‍यांनी गुरुवारी ६१ भारतीय मच्छिमारांना अटक केली असून त्यांच्या ११ बोटीही ताब्यात घेतल्या आहेत. अटक झालेल्या भारतीय मच्छिमारांना कराचीतील पोलिस स्थानकावर ठेवण्यात आले असल्याचे तेथील पोलीस सूत्रांनी सांगितले. या सर्वांवर विदेश कायदा व मच्छिमारी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उभय देशांतर्फे परस्परांच्या मच्छिमारांना सागरी हद्दीचे उल्लंघनाच्या कृतीबद्दल अशा प्रकारे अटक केली जात असते. पाकिस्तानच्या सिंध प्रांत व भारताच्या गुजरातच्या मच्छिमारांना अटक केली जाते. याआधी मे महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ नवी दिल्लीत आले असता पाकिस्तानात जेरबंद असलेल्या १५० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती.