५ लाखांचे ड्रग्स मोरजी येथे जप्त

0
8

पेडणे पोलिसांनी काल जवळपास ५ लाखांचे ड्रग्स मोरजी येथे जप्त केले. तसेच मधलावाडा-मोरजी येथे राहणार्‍या ४५ वर्षीय रशियन नागरिकास अटक केली असून, त्याचे नाव रेबेरिव्ह अलेक्सेई असे आहे. त्याच्याकडून ४६५ ग्रॅम वजनाचे चरसचे तेल (४,६५,००० रुपये) आणि व २४० ग्रॅम वजनाचा गांजा (२४,००० रुपये) जप्त करण्यात आले. पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांना खास सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली की, एका रशियन नागरिकाने मधलावाडा-मोजी येथे त्याच्या भाड्याच्या खोलीत अमलीपदार्थ लपवून ठेवले असून, तो त्याच्या संभाव्य ग्राहकांना ते वितरित करणार आहेत. या माहितीच्या आधारे जीवबा दळवी यांनी उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, विवेक हळर्णकर, हरीश वायंगणकर, प्रवीण महाले, स्वप्नील शिरोडकर, विष्णू गाड आणि संदेश वरक यांच्यासह छापा टाकून संशयिताला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पेडणे पोलीस स्थानकात एनडीपीएस कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.