येत्या ४ जानेवारी रोजी केंद्र सरकारसोबत होणार्या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी काल झालल्या शतकर्यांच्या बैठकीनंतर दिला. कृषी कायद्यांविरोधात गेल्या ३७ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार तिन्ही कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीसंदर्भात कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. मंगळवारच्या चर्चेत तोडगा न निघाल्यास ६ तारखेला जीटी करनाल रोडवर ट्रॉली यात्रा काढणार असल्याचे यादव म्हणाले. तरीही सरकारने काहीच हालचाल केली नाही तर पुढील आठवड्यात एखाद्या दिवशी शाहजहानपूर सीमेवर दिल्लीच्या दिशेने आम्ही कूच करू. असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.