३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी बँक कर्मचारी संपावर जाणार

0
131

पगारवाढीच्या आपल्या मागणीकडे सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करीत नसल्याचे दिसून आल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला असून प्रथम ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी असे दोन दिवस नंतर ११, १२ व १३ मार्च असे तीन दिवस व तरीही मागणी मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

वेतनात २० टक्के वाढ केली जावी व ती पे सीलवरील वाढ असावी. आठवड्यात ५ दिवसच बँका खुल्या ठेवल्या जाव्यात, विशेष भत्त्यांचा मूळ वेतनात समावेश केला जावा, नवीन पेन्शन योजना रद्द केली जावी, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा केली जावी, आदी बारा मागण्यांचे एक निवेदन संघटनेने सरकारला सादर केले आहे. भारत सरकारच्या कामगार मंत्रालयातील मुख्य कामगार आयुक्ताबरोबर समझोता करण्यासाठीची बैठक २७ जानेवारी रोजी झाली. मात्र, यावेळी आरबीआयने मागण्या मान्य करण्यास नकार दिला.