२ मृत्यूंसह कोरोनाचे २३५ बाधित

0
132

राज्यात चोवीस तासांत नवीन २३५ कोरोना रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६१८ झाली आहे. तर रुग्णांच्या एकूण संख्येने ४४ हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४,१८९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २२०९ एवढी आहे.

राज्यात काल २३९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१ हजार ३६२ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६० टक्के एवढे आहे.

आणखी २ रुग्णांचा मृत्यू
गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना फोंडा येथील ६५ वर्षीय महिला आणि वास्कोतील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.
उत्तर गोव्यातील चिंबल येथील सध्याच्या रुग्णांची संख्या १४७ एवढी आहे. पणजी १३९, कोलवाळ येथे ११२ रुग्ण, खोर्ली येथे ११० रुग्ण, पर्वरी येथे १०६ रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव परिसरातील सध्याच्या रुग्णांची संख्या १९७ एवढी आहे. फोंडा परिसरात १२७ रुग्ण, वास्को येथे ११७ रुग्ण आहे. इतर भागातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.

खाटांच्या संख्येत कपात
राज्यातील कोविड केअर सेंटरमधील खाटांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे.

‘आप’चे राहुल म्हांबरे कोरोना पॉझिटिव्ह

आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांना कोरोनाचा संसर्ग झालेला असून त्यांनी स्वतःच्या घरी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. काल यासंबंधी माहिती देण्यासाठी केलेल्या ट्विटमधून त्यांनी मागील काही दिवस जे जे कोण आपल्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःच्या घरी विलगीकरणात राहून स्वतःकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली आहे.