स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गोव्यातील तुरुंगातील चार कैद्यांची येत्या २६ जानेवारी रोजी तुरुंगातून सुटका होणार आहे.
केंद्र सरकारने यावर्षी जूनमध्ये या संदर्भात राज्यांना सूचित केले होते. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेण्यासाठी एका स्क्रिनिंग समितीची स्थापना केली होती. या समितीने चार नावांची शिफारस केली आहे. त्यात हसन मिया मुल्ला, बॅनर केसिंग, सिदलिंगपा बिसनल आणि विनोद खुटकर या चार जणांचा समावेश आहे.