२०० कोटींच्या औद्योगिक प्रकल्पांना पर्रीकरांची मंजुरी

0
111

पणजी
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगच्या माध्यमातून काल घेतली. या बैठकीत अंदाजे २०० कोटी रुपयांच्या ८ औद्योगिक आणि हॉटेल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपये गुंतवणुकीचे विविध प्रकल्प प्राप्त झाले आहेत. या बैठकीत काही प्रकल्पांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. काही प्रकल्पांवर पुढील बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली पाहिजे, असा नियम आहे. ते आजारी असल्याने गेले कित्येक महिने मंडळाची बैठक घेण्यात आली नव्हती.