१७४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

0
128

>> कुठ्ठाळी, लोटली, चिंबलमध्ये रुग्ण वाढले

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण कायम असून नवीन १७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळले आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १६६६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित १४४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने २९ जणांचा बळी घेतला आहे. आत्तापर्यंत ४३५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील २६५५ रुग्ण बरे झाले आहेत.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळामधील कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ३६ जणांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना संशयित म्हणून आत्तापर्यंत १२७१ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. जीएमसीच्या प्रयोगशाळेतील ७८७८ नमुन्यांपैकी २४०२ नमुन्यांची तपासणी गुरूवारी करण्यात आली असून ५४७६ नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.

कुठ्ठाळीत नवीन २३ रुग्ण
कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात नवीन २३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ४०० झाली आहे. जुवारीनगरात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. वास्को येथे ३७३ रुग्ण आहेत.

लोटलीत १६ रुग्ण
लोटली आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात नवीन १६ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या २४ झाली आहे. चिंचिणी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला आहे.

सांगे, मडगावात रुग्ण
सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात नवीन १ रुग्ण आढळून आला आहे. मडगाव येथे ५ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ७२ झाली आहे.

कांदोळीत १० रुग्ण
कांदोळी येथे नवीन १० रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २१ झाली आहे. पर्वरी परिसरात २२ रुग्ण आहेत.

शिवोली, कोलवाळमध्ये रुग्ण
शिवोली येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १३ झाली आहे. कोलवाळमध्ये नवीन ६ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४३ झाली आहे.

म्हापशात २ रुग्ण
म्हापसा येथे नवीन २ रुग्ण आढळले असून रूग्णसंख्या ६३ झाली आहे. पेडणे येथील रुग्णांची संख्या २६ आहे. वाळपई येथे नवीन १ रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या ७ झाली आहे. साखळी येथे रुग्णांची संख्या ९१ आहे.

तीन प्रवासी कोरोनाबाधित
राज्यात आलेले ३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोना बाधित प्रवाशांची संख्या १३२ झाली आहे. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या वाढतच असून ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

चिंबलमध्ये १५ रुग्ण
चिंबलमध्ये नवीन १५ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. पणजीमध्ये ३५ रुग्ण आढळून आलेले आहेत. मार्केटमधील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या इमारतीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.